एचएएलच्या बसचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:20 PM2020-06-08T22:20:03+5:302020-06-08T23:59:10+5:30

कायमच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या येथील एचएएल कारखान्याच्या बसचालकांच्या बेशिस्त वाहन चालवण्याच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर सुरू झालेल्या एचएएल कारखान्यात कामगारांना ने-आण करण्यासाठी बससेवा सुरू झाली आहे.

Arbitrariness of HAL bus drivers | एचएएलच्या बसचालकांची मनमानी

एचएएलच्या बसचालकांची मनमानी

Next
ठळक मुद्देओझर : वाहतुकीचे नियम धाब्यावर; अपघातांना निमंत्रण

ओझर : कायमच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या येथील एचएएल कारखान्याच्या बसचालकांच्या बेशिस्त वाहन चालवण्याच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर सुरू झालेल्या एचएएल कारखान्यात कामगारांना ने-आण करण्यासाठी बससेवा सुरू झाली आहे.
मात्र, बसचालकांच्या बेशिस्तीमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सध्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर येथे दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. एचएएल कामगारांना घेऊन जाणाºया बसेस या महामार्गावर विरुद्ध दिशेने सुसाट जाताना दिसून येतात.
त्यामुळे समोरून येणाºया चालकांना जीव मुठीत धरून आपले वाहन चालवावे लागत आहे.
ओझर शहराच्या लगत अनेक उपनगरे असून, या उपनगरांतील रस्ते थेट सर्व्हिस रोडलगत असल्याने उपनगरातील वाहनचालकांनादेखील या वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित विभागाने चौकशी करून अशा बेशिस्त वाहनचालकांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर हद्दीतील उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून, ठरवून दिलेल्या मार्गावरूनच वाहने चालवावीत, अन्यथा वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
- वर्षा कदम, पोलीस निरीक्षक, महामार्ग वाहतूक, ओझर मिग

Web Title: Arbitrariness of HAL bus drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.