रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्याची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 10:59 PM2022-02-07T22:59:39+5:302022-02-07T23:01:13+5:30

लासलगाव : केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास लासलगाव रेल्वे बुकिंग ऑफिसकडून नकार मिळत असल्याने ग्राहक मात्र चक्रावले आहेत.

Arbitrariness of booking officer at railway station | रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्याची मनमानी

रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्याची मनमानी

Next
ठळक मुद्देलासलगाव : ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास नकार ; प्रवासी त्रस्त

लासलगाव : केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास लासलगाव रेल्वे बुकिंग ऑफिसकडून नकार मिळत असल्याने ग्राहक मात्र चक्रावले आहेत.

येथील रेल्वे स्थानकातील बुकिंग अधिकारी प्रवाशांशी नीट बोलत नाही, सुट्या पैशांवरून गोंधळ घातला जातो. रिझर्व्हेशनवरून नेहमी प्रवाशांना त्रास दिला जात असल्याने रोज वेगवेगळ्या तक्रारी येत आहे, मात्र तक्रार करूनही याच्यात काहीच फरक पडलेला नाही.
येथील लोकप्रतिनिधी प्रवाशांना आवाहन करतात की, प्रवाशांनी तिकिटे, रिझर्व्हेशन हे लासलगाव रेल्वे स्थानकावर करा, जेणेकरून लासलगाव रेल्वे स्थानकाचा व्यवसाय दिसेल. याला प्रवाशी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहे. मात्र या सरकारी बाबू नागरिकांना समाधानकारक उत्तर देत नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रिझर्व्हेशन तिकिटासाठी कार्ड पेमेंट चालणार नाही. तर थेट रोख पैशांची मागणी केली जात आहे. तिकीट खिडकीवर मोठ्या अक्षरात सर्व प्रकारचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील असे नोटिफिकेशन लावलेले असताना अधिकारी मात्र रेल्वेच्या नियमाची पायमल्ली करत आहे. जर कार्ड पेमेंट बंद झाले आहे तर नोटिफिकेशन काढण्याची तसदी सुद्धा या महाशयांनी घेतली नसल्याचे नागरिक सांगत आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदीसरकारने ऑनलाइन व्यवहाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रेल्वे बोर्डानेसुद्धा रिझर्व्हेशन तिकीटसाठी कार्डाच्या
माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा दिली होती. नागरिकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बँकिंगसारख्या अनेक यंत्रणांचा वापर करत आपल्या गरजा भागविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रेल्वे तिकीट बुकिंगसाठी रोख रकमेची मागणी केली जात असल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. 

Web Title: Arbitrariness of booking officer at railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.