स्मार्ट सिटीमध्ये अधिकाऱ्यांची मनमानी; माजी पर्यावरण अधिका-याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:31 PM2019-12-17T13:31:04+5:302019-12-17T13:36:01+5:30

नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आणि अन्य काही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून प्रामाणिक कर्मचा-यांना कोणत्याही कारणावरून कामावरून काढून टाकले जाते. या शिवाय कंपनीच्या कामकाजात अनागोंदी सुरू असून थविल यांच्या बरोबरच कंपनीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी कंपनीचे माजी मुख्य पर्यावरण अधिकारी सुनिल विभांडीक यांनी मंगळवारी (दि.१७) पत्रकार परिषदेत केली आहे.

Arbitrary of officers in Smart City; Former Environmental Officer charged | स्मार्ट सिटीमध्ये अधिकाऱ्यांची मनमानी; माजी पर्यावरण अधिका-याचा आरोप

स्मार्ट सिटीमध्ये अधिकाऱ्यांची मनमानी; माजी पर्यावरण अधिका-याचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देकोणत्याही कर्मचा-याला काढून टाकले जातेथविल यांची सीबीआय चौकशी करा

नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आणि अन्य काही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून प्रामाणिक कर्मचाºयांना कोणत्याही कारणावरून कामावरून काढून टाकले जाते. या शिवाय कंपनीच्या कामकाजात अनागोंदी सुरू असून थविल यांच्या बरोबरच कंपनीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी कंपनीचे माजी मुख्य पर्यावरण अधिकारी सुनिल विभांडीक यांनी मंगळवारी (दि.१७) पत्रकार परिषदेत केली आहे.

विभांडीक यांच्यावर चुकीच्या कामाचा ठपका ठेवून त्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी कार्यमुक्त केले आहे. तथापि, आपण त्यांचे यासंदर्भातील आदेश स्विकारले नसून आपण कायदेशीर लढाई लढत असल्याचे विभांडीक यांचे म्हणणे आहे.

स्मार्ट सिटीतील नोकर भरती ही गुणवत्ता डावलून केली जात असून थविल यांच्या मनमानीमुळे अधिकारी तसेच कर्मचायांना कशीही वागणूक दिली जाते. चांगले आणि प्रामाणिक काम करणाºया अधिकारी आरि कर्मचाºयाची थविल यांना अडचण होते. त्यांना मनमानी पध्दतीने कार्यमुक्त केले जात आहे, असा आरोप करून त्यांनी कंपनीच्या कामात देखील घोळ आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने पाचशे कोटी रूपयांची तरतूद करून देखील कामे होत नाही. सुमारे साडे तीनशे कोटी रूपयांचा निधी अक्षर: पडून आहे. कंपनीच्या अधिकाºयांच्या अकार्यक्षमतेचे खापर अन्य अधिकारी आणि कर्मचाºयांवर फोडून त्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची रीतसर चौकशी करावी अशी माणीही विभांडीक यांनी केली आहे.

Web Title: Arbitrary of officers in Smart City; Former Environmental Officer charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.