तताणी येथील राखीव वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:43 AM2018-03-06T01:43:19+5:302018-03-06T01:43:19+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.
सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दरवर्षी वृक्ष लागवड व जंगल संवर्धनावर शासन कोट्यावधी रु पये खर्च करते. शासनाच्या योजनेमधून तताणी गावच्या ग्रामस्थांच्या सहभागातून चराई ,कुºहाड बंदी करून शेकडो हेक्टर वनक्षेत्र विकसीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या माध्यमातून तताणी गावालगत असलेल्या उत्तरेकडील डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला गेल्या दोन दिवसांपूर्वी काही अज्ञात माथेफीरूंनी आग लावली असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. रात्रीच्या सुमारास लावलेल्या या आगीच्या भक्षस्थानी शेकडो एकर वनक्षेत्र सापडले. गावातील वन समितीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून ही आग विझविण्यासाठी दोन दिवस शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांना ही भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत शंभरहून अधीक क्षेत्रावरील वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. साग ,शिसव ,बेहडा ,बांबू आदी डेरेदार वृक्षांसह मोर ,ससे ,घोरपड ,लांडगे ,कोल्हे ,रानमांजर तसेच दुर्मिळ पक्षांना आपला जीव गमवावा लागला. आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज आहे. या भीषण आगीतील नुकसानीचा अद्याप संबंधीत अधिकाºयांनी अद्याप पंचनामा न केल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.
आग लागली की लावली ?
बागलाण तालुक्यात दर वर्षी वृक्ष लागवड व जंगल संवर्धनासाठी शासन कोट्यावधी रु पये खर्च करत आहे. असे राखीव वनक्षेत्र लोकसहभागातून ठिकठिकाणी विकसीत केले जाते.परंतु चार पाच वर्ष राखून डेरेदार वृक्ष झाल्यांनतर आग लागण्याचे प्रकार दरवर्षी घडतात .यंदा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दसाणा येथील राखीव वन क्षेत्राला आग लागून लाखो रु पयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतांना तताणी या राखीव वनक्षेत्राला आग लागली आहे.मात्रआग लावली की लागली याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाºयांना अद्याप शोध लागला नाही. हा संशोधनाचा भाग असला तरी या परिसरात कागदोपत्री वृक्ष लागवड लपविण्यासाठी आग लावली की नव्याने त्याठीकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आग लावली गेली. याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.