‘कपाट’प्रकरणी लागणार वास्तुविशारदाचे प्रतिज्ञापत्र
By admin | Published: June 21, 2017 12:59 AM2017-06-21T00:59:33+5:302017-06-21T01:00:01+5:30
महापालिका : नऊ मीटरवरील प्रकरणे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बहुचर्चित व वादग्रस्त ठरलेल्या ‘कपाट’संबंधी नऊ मीटर रस्त्यांवरील प्रकरणे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल होण्यास सुरुवात झाली असली तरी काही विकासकांकडून क्षेत्र दडवादडवीचा प्रकार निदर्शनास आल्याने महापालिकेने आता प्रकरणासोबत वास्तुविशारदाचेही प्रतिज्ञापत्र मागितले आहे. त्यामुळे अनेक विकासकांचे धाबे दणाणले आहे.आॅटो डिसीआरमुळेही विलंबमनपाने आॅटो डिसीआर संगणकीय प्रणाली १ जूनपासून कार्यान्वित केली आहे. त्यानुसार, काही विकासकांनी बांधकाम प्रकरणेही आॅनलाइन सादर केलेली आहेत. परंतु, सर्व कागदपत्रे नियमानुसार अपलोड केलेली असतानाही त्यावर अंतिम निर्णय होत नसल्याने संबंधित विकासक त्रस्त झाले आहेत. आॅटो डिसीआरमुळेही विलंब होत असल्याने प्रकरणे टाकावी की नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.