अर्धांगिनीच्या विरहवेदनेने पतीनेही सोडला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:57+5:302021-05-22T04:14:57+5:30

देवळा तालुक्यातील भऊर येथील भूमिपुत्र व सटाणा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रकाश रामचंद्र पवार (५०) हे नोकरीनिमित्त सटाण्यात स्थायिक झाले ...

Ardhangini's bereavement also left her husband breathless | अर्धांगिनीच्या विरहवेदनेने पतीनेही सोडला श्वास

अर्धांगिनीच्या विरहवेदनेने पतीनेही सोडला श्वास

Next

देवळा तालुक्यातील भऊर येथील भूमिपुत्र व सटाणा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रकाश रामचंद्र पवार (५०) हे नोकरीनिमित्त सटाण्यात स्थायिक झाले होते. सटाणा येथील माहेर असलेल्या त्यांच्या पत्नी प्रा. मनीषा पवार (४७) यादेखील पतीसोबतच मराठीच्या अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. दोघेही विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून महाविद्यालयात परिचित होते. महिन्याभरापूर्वी दोघांसह मुलगा शाहू (१४) व भावजयी मंगला धर्मराज पवार (५३) यांना कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला पती-पत्नीने आजार अंगावर काढल्यामुळे कोरोनाने दुसरी पातळी गाठली होती. त्यामुळे दोघांनाही अतिदक्षता वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. सटाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर विविध उपचार सुरू असताना परिस्थिती हाताबाहेर गेल्याने प्रा. मनीषा यांना वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. अर्धांगिनी सोडून गेल्याचे दु:ख असह्य झाल्याने प्रा. पवार यांची प्रकृती खालावली. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र पत्नीच्या निधनानंतर तेराव्या दिवशी त्यांनीही प्राण सोडले. त्यांच्या पाठोपाठ भावजयी मंगला पवार यांचादेखील कोरोनाने बळी घेतला. मातृपितृ छत्र हरपलेला शाहू घरातच उपचार घेत असून, त्याच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ नये यासाठी त्याच्या आई-बाबांच्या मृत्युबद्दल अद्याप कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सात भावंडांच्या कुटुंबात प्रकाश पवार हे सर्वांत लहान तसेच शेतकरी संघटनेचे नेते स्व. नरेंद्र अहिरे यांचे साडू होत.

इन्फो...

मविप्र सेवक सोसायटीमध्ये कार्यरत असताना प्रकाश पवार यांनी सेवक सदस्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यात महत्त्वाचे म्हणजे सभासदांची कर्जमर्यादा ५० लाख रुपयांपर्यंत वाढविली. संस्थेत ठेवींवरील व्याजदर आणि कर्जावरील व्याजदर ७ टक्के इतका एकसमान ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी ९२ लाख रुपयांचा नफा झाला होता.

फोटो - २१ सटाणा १

===Photopath===

210521\21nsk_35_21052021_13.jpg

===Caption===

प्रा. पवार दाम्पत्य

Web Title: Ardhangini's bereavement also left her husband breathless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.