खडकी परिसरात मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:26+5:302021-06-30T04:10:26+5:30
खडकी : माळमाथ्यावर गेल्या २० दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र काल सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ...
खडकी : माळमाथ्यावर गेल्या २० दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र काल सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी पेरण्या उशिराने सुरू होत आहेत. मागील वर्षी मृग नक्षत्रात पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पिकांची पेरणी उशिराने सुरू झाली आहे. शेतकरी आपल्या शेताची मळणीची कामे आटोपून पावसाची वाट बघत होते. मृग नक्षत्रातील पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झाला होता. आर्द्रा नक्षत्रातील पावसाचा हजेरीने शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहेत. माथ्यावरील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण कापसाची पेरणी मृग नक्षत्रात केली तरच पुढील काळात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळते; मात्र कोरड कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. त्या बदल्यात शेतकरी आता मक्याची पेरणी करणार असल्याने मक्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे. बाजरी, कडधान्य, कांद्याची रोपे आदी कामांना शेतकऱ्याचा सुरुवात केलेली आहे. पाऊस हा पेरणीपुरता झाला असल्याने सध्या तरी विहिरींना पाणी अजूनही आलेले नाही. यामुळे बागायती शेतीलाही अजून घरघरच आहे. पावसाने उशीर केल्याने शेतकऱ्यांनी आपली पीक पेरणीचा खर्च कर्ज काढून बियाणे खरेदी आणि व खरेदी खते केली होती. त्याचप्रमाणे आपली आर्थिक अडचणी भागवून शेतीतील पिकांच्या लागवडीसाठी आपली पुंजी भांडवल शेती उत्पादनात लावून दिलेली आहे.
-----------------------
आर्थिक भांडवलासाठी शेतकऱ्यांची कसरत
सद्यस्थितीत या वर्षी कांद्याच्या उत्पादनाला बरा भाव असल्याने शेतकऱ्यांकडे स्वत:चे भांडवल उपलब्धता असल्याने शेतकरी आर्थिक भांडवलासाठी स्वतःच उभारत आहे. शेतकऱ्यांनी तूर्तास घेणे थांबवले आहे. शेतीचा मळणीच्या कामांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर यंत्राचा वापर करून आपले व शेती तयार केलेली आहेत. त्याचप्रमाणे बैलजोडीने वखरणी किंवा बेले फाळणी करीत आहेत. एकंदरीतच शेतकरी आता आपल्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र दिसत आहे.