हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन वाद, डोक्यात घातला कोयता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 09:56 PM2021-03-18T21:56:19+5:302021-03-19T01:15:11+5:30
त्र्यंबकेश्वर : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जखमी केल्याची घटना हरसूलजवळील मुरंबी येथे घडली.
त्र्यंबकेश्वर : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जखमी केल्याची घटना हरसूलजवळील मुरंबी येथे घडली.
मुरंबी येथे हळदीचा कार्यक्रम सुरु होता. त्यात एका बाजूला वाजंत्र्यांच्या तालावर नाचण्याचा कार्यक्रम रंगला होता. यावेळी नाचताना फिर्यादी हेमंत लक्ष्मण भांगरे (रा. मुरंबी) व संशयित नारायण काळू भोये (रा. उंबरपाडा, पो. ठाणापाडा) यांच्यात नाचण्यावरुन वादावादी झाली. यावेळी नारायण याने कोयत्याने हेमंतच्या डोक्यात वार केला. हेमंत गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्याला त्वरित नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यात गंभीर जखमी झालेला हेमंत हा शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी रुग्णालयात जात जखमीची फिर्याद दाखल करुन घेतली. हरसूल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागवे करत आहेत.