पंचवटी आगारात गुंडांचा सशस्त्र हल्ला

By admin | Published: December 15, 2015 12:39 AM2015-12-15T00:39:31+5:302015-12-15T00:40:10+5:30

दोघे गंभीर : आजपासून एसटीला ‘ब्रेक’चा निर्णय

Armed assault of goons in Panchavati Jail | पंचवटी आगारात गुंडांचा सशस्त्र हल्ला

पंचवटी आगारात गुंडांचा सशस्त्र हल्ला

Next

नाशिक : पंचवटी बस डेपो क्रमांक दोनमध्ये बसचालकासह दोघा सुरक्षारक्षकांवर एका टोळक्याने हल्ला करून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी (दि़ १४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दुचाकीस कट मारल्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी बसचालक एऩ के.जाधव, सुरक्षारक्षक एच़एस़ गाढवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काट्या मारुती पोलीस चौकीजवळ दुचाकीस कट लागल्याच्या कारणावरून वाघाडीतील (संजयनगर) सुमारे पंचवीस जणांचे टोळके रात्री आठ वाजेच्या सुमारास पंचवटी डेपोत घुसले़ प्रवेशद्वारावर डेपो मॅनेजरची चौकशी करून कॅबिनवर दगडफेक सुरू केली़ तसेच बसचालक एऩ के.जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला़ त्यास रोखण्यासाठी गेलेले सुरक्षारक्षक एच़ एस़ गाढवे यांच्यावरही शस्त्राने वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेले एऩ के.जाधव यांच्यावर पंचवटीतील सद्गुरू हॉस्पिटल, एच़ एस़ गाढवे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामध्ये सुरक्षारक्षकांची केबिन अक्षरश: रक्ताने माखली होती़
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे, विभाग नियंत्रक यामिनी जोशी, पोलीस कर्मचारी वाघ, सोनवणे व कोकाटे घटनास्थळी दाखल झाले होते़ रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिसांकडून फरार संशयितांचा शोध सुरू होता़ (प्रतिनिधी)

एसटी आगारात येऊन कर्मचाऱ्यांना, तसेच चालक व वाहकांना मारहाणीच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत़ मात्र संबंधितांवर कडक कारवाई केली जात नाही़ एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणार नसेल तर ते काम कसे करणाऱ हल्लेखोरांना अटक होणे गरजेचे असून, या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी डेपोतून एकही बस न काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे़
- विजय पवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

संशयितांच्या शोधासाठी टीम रवाना

एसटी कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला करणाऱ्या टोळक्यातील एका संशयितास दुचाकीसह ताब्यात घेतले आहे़ या हल्ल्यातील आणखी सहा संशयितांची नावे समजली असून त्यांच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आली आहे़ हे सर्व संशयित वाघाडीतील रहिवासी असल्याचे समोर आले आहे़
- प्रकाश सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी

Web Title: Armed assault of goons in Panchavati Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.