शस्त्रसाठ्याने ‘यूपी’ पोलिसांत खळबळ अधिकाºयांच्या बैठकांवर बैठका : बांदा जिल्ह्याचे पोलीस पथक नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:06 AM2017-12-17T01:06:50+5:302017-12-17T01:07:57+5:30

ग्रामीण पोलिसांनी चांदवडमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर पोलिसांच्या या कामगिरीचे राज्यात कौतुक केले जात आहे;

Armed Forces Meetings at 'UP Police' Sensational Authority: Banda District Police Station Nashik | शस्त्रसाठ्याने ‘यूपी’ पोलिसांत खळबळ अधिकाºयांच्या बैठकांवर बैठका : बांदा जिल्ह्याचे पोलीस पथक नाशकात

शस्त्रसाठ्याने ‘यूपी’ पोलिसांत खळबळ अधिकाºयांच्या बैठकांवर बैठका : बांदा जिल्ह्याचे पोलीस पथक नाशकात

Next
ठळक मुद्देपोलीस पथक नाशकात धडकले लुुटीबाबत सखोल तपास उत्तर प्रदेशमधून पलायन करण्यास यशस्वी

नाशिक : ग्रामीण पोलिसांनी चांदवडमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर पोलिसांच्या या कामगिरीचे राज्यात कौतुक केले जात आहे; मात्र उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये याप्रकरणी खळबळ उडाली असून, उच्चस्तरीय अधिकाºयांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्णाचे एक पोलीस पथक नाशकात धडकले असून, शस्त्रसाठ्याची पडताळणी सुरू केली आहे.
याप्रकरणी ‘लोकमत’ने पाठपुरावा करताना उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी हा शस्त्रसाठा उत्तर प्रदेशमधून लुटल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच याप्रकरणावरून उच्चस्तरीय अधिकाºयांच्या बैठका सुरू असून, या लुुटीबाबत सखोल तपास करण्याच्या दृष्टीने आता तपासचक्रे गतिमान केली आहे. बांदाच्या पोलीस अधीक्षक शालिनी गोविंद राम यांनी तातडीने पथक रवाना केले आहे. बांदा जिल्ह्णाच्या रेल्वेस्थानकापासून काही मीटर अंतरावर असलेल्या पंजाब आर्म्स सेंटर हे दुकान दाऊदचा शार्पशूटर बादशाह ऊर्फ सुका पाचा व त्याच्या साथीदारांनी बुधवारी (दि.१३) मध्यरात्री फोडले. या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात ठेवलेली शस्त्रे त्यांनी लुटून उत्तर प्रदेशमधून पलायन करण्यास यशस्वी झाले. महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाल्यानंतर यांनी मालेगाव तालुक्यातील वाके गावाच्या शिवारात एका पेट्रोलपंपावर पिस्तूलचा धाक दाखवून इंधनाची टाकी भरून घेत पोबारा केला; मात्र पेट्रोलपंपचालकाने तातडीने सदर बाब पोलीस नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आणून दिली. चांदवड पोलिसांनी लागलीच नाकाबंदी करून शस्त्रांचा साठा असलेल्या जीपसह सुका पाचा व त्याच्या साथीदारांना गुरुवारी (दि. १४) रात्री महामार्गावर रंगेहाथ पकडले.
लुटीसाठी जीपची विशेष रचना
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब आर्म्स सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे जमा करण्यात आली होती. याबाबत सुका पाचा व त्याच्या साथीदारांनी नियोजनबद्धरीत्या दुकान लुटले. या लुटीसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो जीपदेखील विशेष बनावटीची होती. जीपच्या आतील बाजूने छताला लागून एक क प्पा बनवून घेण्यात आला होता. सीटकव्हरमध्येही शस्त्रे लपविण्यासाठी जागा करण्यात आली होती. पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या व जीप पोलीस ठाण्यात आणून झडती घेतली असता शस्त्रांचे घबाड हाती आले.
गुन्हेगारांचा शोधार्थ दोन पथक मुंबईला
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्णातील शस्त्रास्त्रांच्या दुकानाच्या लुटीत सहा ते सात संशयित सराईत गुन्हेगारांचा सहभाग होता; मात्र काही गुन्हेगारांनी घटनास्थळावरून थेट मुंबई गाठली, तर काही संशयित जीपमधून नाशिकमार्गे मुंबईला पोहचणार होते. दरम्यान, जीपसह सराईत गुन्हेगारांच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ग्रामीण गुन्हे शाखेचे दोन पथके मुंबईला रवाना करण्यात आली आहेत. या पथकांना उर्वरित गुन्हेगारांना शोधून काढण्याचा ‘टास्क’ देण्यात आला आहे. या पथकांमध्ये एक अधिकाºयासह सात ते आठ पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. एकूणच या शस्त्रसाठा लुटीप्रकरणात अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे तपासात पुढे येत आहे. कारण सराईत गुंड बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका हा दाऊद टोळीतील शार्पशूटर आहे. यामुळे पोलीस पथकांना त्यांचे या गुन्ह्णातील उर्वरित फरार साथीदारांना मुंबईतून शोधणे हे आव्हान असून, यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: Armed Forces Meetings at 'UP Police' Sensational Authority: Banda District Police Station Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस