मालेगावी स्ट्रॉँगरूमसमोर सशस्त्र पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:39 PM2019-10-22T22:39:35+5:302019-10-22T22:40:23+5:30
मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी
२ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
उद्या गुरुवारी (दि. २४) मालेगाव मध्यची छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना येथे, तर बाह्य मतदारसंघाची वखार महामंडळाच्या गुदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी कक्षात टेबल, खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. तर स्ट्रॉँगरूम बाहेर पोलिसांचा सशस्र बंदोबस्त चोवीस तास तैनात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालेगाव बाह्य मतदारसंघात ३०८ मतदान केंद्रांद्वारे मतदान घेण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५९.३५ टक्के मतदान झाले. तीन लाख ४० हजार ९११ मतदारांपैकी दोन लाख दोन हजार ३१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख १० हजार ५७ पुरुष, तर ९२ हजार २६१ महिला मतदारांचा समावेश होता. मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. उद्या, गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मध्य व बाह्य मतदारसंघात सकाळी ८ वाजता टपाली मतदानापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी प्रत्येकी दोन्ही मतदारसंघासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. एका टेबलवर चार अशा १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ फेऱ्यांमध्ये अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता
आहे. दुपारी २ पर्यंत निकाल लागणार आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मालेगाव मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा, बाह्यचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रिंगणातील उमेदवारांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तरुणाविरुद्ध मतदान गोपनीयता भंगचा गुन्हामालेगाव बाह्य मतदारसंघातील चंदनपुरी येथील मतदान केंद्र क्र. २९५ मध्ये मतदान चालू असताना मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जाऊन मतदानाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भरत प्रकाश शेलार, रा. चंदनपुरी या तरुणाविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात मतदान गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक केंद्रप्रमुख मुश्ताक अहमद अब्दुल कादीर यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. मिसळ यांनी गंभीर दखल घेत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केंद्रप्रमुखांना दिल्या होत्या.मालेगाव बाह्य मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रजित राजपूत यांनी मंगळवारी वखार महामंडळाच्या गुदामातील स्ट्रॉँगरूमची पाहणी करून सुरक्षिततेचा आढावा घेतला. उपस्थित सुरक्षा अधिकाºयांना सूचना केल्या. तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.