कळवणला पोलिसांचे सशस्त्र संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:01 AM2017-08-27T01:01:21+5:302017-08-27T01:01:27+5:30
गणेशोत्सव व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर कळवण शहरात पोलिसांना सशस्त्र करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कळवण पोलीस स्टेशनची यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा या निमित्ताने दिला आहे.
कळवण : गणेशोत्सव व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर कळवण शहरात पोलिसांना सशस्त्र करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कळवण पोलीस स्टेशनची यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा या निमित्ताने दिला आहे. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील उपद्रवींवर कळवण पोलिसांची करडी नजर असून, प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करून गोंधळ घालणाºया उपद्रवींवर पोलिसांनी कडक कारवाईचे हत्यार उपसल्याने विविध पोलीस कलमानुसार पोलीस कारवाई केली जाणार आहे. गणेशोत्सवात कायदाभंग करणाºया व गोंधळ घालणाºया उपद्रवींवर व मौजमजा करणाºया हौशा नवश्यांवर पोलिसांची करडी नजर असून, साध्या वेशातील फिरते पथक तैनात करून उपद्रवींची हयगय केली जाणार नाही असे सूतोवाच पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिले. पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनपासून संचलनाचा शुभारंभ झाला. मेनरोड, बसस्थानक, गणेशनगर, भाजी मार्केट, नगरपंचायत, गांधीचौक, सुभाषपेठ, नेहरू चौक, फुलाबाई चौक व फाशी चौक मार्गे संचलन करून कळवण पोलीस स्टेशनची यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा देण्यात आला. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.