नाशिकरोडला पोलिसांचे सशस्त्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:36 AM2019-04-27T00:36:19+5:302019-04-27T00:36:43+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाकडून सशस्त्र संचलन करण्यात आले.

 Armed movement of police in Nashik Road | नाशिकरोडला पोलिसांचे सशस्त्र संचलन

नाशिकरोडला पोलिसांचे सशस्त्र संचलन

Next

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रशासनाकडून सशस्त्र संचलन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार (२९ एप्रिल) मतदान होणार असून या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. समाजकंटक व राजकीय पक्षाकडून वादविवाद, दहशत निर्माण होऊ नये, मतदान शांततेत, निर्भयपणे पार पडावे याकरिता पोलीस प्रशासन व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दाखविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी नाशिकरोड परिसरात व संवेदनशील भागात संचलन करण्यात आले.
नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, मालधक्कारोड, सिन्नरफाटा परिसर, जेलरोड, शिवाजीनगर, पवारवाडी कॅनलरोड आदि भागात पोलीस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले.  नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, दुय्यम पोलीस निरीक्षक सुधीर डोंबरे यांच्यासह शीघ्रकृती दल, दंगा नियंत्रण पथक, सीआरपीएफचे जवान या सशस्त्र संचलनात सहभागी झाले होते.

Web Title:  Armed movement of police in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.