शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:33 PM2020-05-19T20:33:23+5:302020-05-19T20:48:52+5:30

भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी

Armed movement of the Rapid Action Force in Old Nashik | शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन

शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावेभद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी धर्मगुरूंची बैठक

नाशिक : कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) रात्री साजरी होत आहे. पुर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.
येत्या २५ तारखेला रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन तसेच कलम-१४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांत पाठविलेल्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांपैकी नाशिकमध्येही एक तुकडी दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण १२५ जवान आहेत. त्यामध्ये डेप्युटी कमान्डंट, सहायक आयुक्त-२, पोलीस निरिक्षक-३, उपनिरिक्षक-४, महिला कर्मचारी-१० आणि उर्वरित जवानांचा फौजफाटा आहे.

भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. नागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मशिदी पुर्णपणे बंदच राहणार असून नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच उपासना (इबादत) करावी असे आवाहन शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी खतीब यांच्यासह धर्मगुरूंची बैठकही झाली. या बैठकीत शब-ए-क द्र तसेच रमजान ईदच्या नमाजपठणाबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सामुदायिक नमाजपठण करणे टाळावे, असे आवाहन यावेळी सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक साजन सोनवणे आदि उपस्थित होते. बैठकीला रजा अकादमीचे एजाज रझा, मौलाना महेबुब आलम, मौलाना कारी अझहर, मौलाना मुजफ्फर अत्तार, हाजी जाकीर अन्सारी आदि उपस्थित होते.

Web Title: Armed movement of the Rapid Action Force in Old Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.