शहरात शस्त्रबंदी, जमावबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 06:03 PM2020-07-20T18:03:13+5:302020-07-20T18:17:58+5:30
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यानुसार शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. येत्या २ आॅगस्टपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
शहरात कायदासुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील (गुन्हे) यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार शहरात बीभत्स वर्तन, कोणत्याही मिरवणूकीतील आक्षेपार्ह हावभाव, घोषणाबाजीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. मिरवणूकीचा मार्ग निश्चित करणे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाची वेळमर्यादा, पध्दती व ध्वनीतीव्रता तपासणे, संगीत कार्यक्रम, ढोल-ताशे वाजविण्यावर नियंत्रण ठेवणे आदिंबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरात कोठेही कोणीही व्यक्त शस्त्र बाळगताना आढळून आल्यास संबंधिताला अटक केली जाणार आहे. विनाकारण गर्दी जमविणाऱ्यांवरही कारवाई क रण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनीट-१ व २ च्या पथकांना देण्यात आले आहे.