एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सेनेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:10+5:302021-02-07T04:15:10+5:30

पंचवटी आगारात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आल्यानंतर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सद्य:स्थितीत शंभर टक्के चालक, वाहक उपस्थित ...

Army bell ringing for demand of ST personnel | एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सेनेचा घंटानाद

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सेनेचा घंटानाद

Next

पंचवटी आगारात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आल्यानंतर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सद्य:स्थितीत शंभर टक्के चालक, वाहक उपस्थित असताना प्रशासकीय नियोजनाअभावी कामगिरीच मिळत नाही. त्यामुळे समय वेतनश्रेणीवरील व रोजंदार गट दाेन या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन हजर दिवस धरून वेतन अदा करण्यात यावे, यांत्रिक खात्याच्या परिपत्रकानुसार बस मार्गस्थ होण्यापूर्वी संपूर्ण यांत्रिक दोष दूर करणे गरजेचे असताना कार्यशाळा अधीक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बस दहा ते पंधरा किलोमीटर अंतर पार पडल्यावर नादुरुस्त होतात. २०२० मध्ये ठरलेल्या फेऱ्यांपेक्षा नियमबाह्य फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ईटीएमआय मशीनची संख्या अपुरी असल्याने बऱ्याचदा वाहकांना त्यासाठी थांबवावे लागते, अशा मागण्यांसाठी आंदोलन करून समस्या सोडविण्याची मागणी केली. श्याम इंगळे, भास्कराव उगले, मुकेश खरोटे, वसंत राठोड यांच्यासह अन्य संघटना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

===Photopath===

060221\06nsk_49_06022021_13.jpg

===Caption===

एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पंचवटी आगारात करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनात सहभागी श्याम इंगळे, भास्कराव उगले, मुकेश खरोटे, वसंत राठोड यांच्यासह अन्य संघटना कार्यकर्ते.

Web Title: Army bell ringing for demand of ST personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.