भाजपचे अर्ज दाखल करताना सेना नगरसेवकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:01 AM2019-10-04T01:01:00+5:302019-10-04T01:02:03+5:30

नाशिक : भाजप आणि शिवसेनेची राज्यात युती झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर राजी-नाराजीचे नाट्य कायम असून, गुरुवारी (दि. ३) नाशिक शहरात भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते अथवा एकही नगरसेवक हजर नव्हता. केवळ खासदार हेमंत गोडसे यांनी औपचारिक हजेरी लावल्याने जागावाटपातील सेनेची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.

Army corporators punished for filing BJP application | भाजपचे अर्ज दाखल करताना सेना नगरसेवकांची दांडी

भाजपचे अर्ज दाखल करताना सेना नगरसेवकांची दांडी

googlenewsNext
ठळक मुद्देनाराजी : उमेदवार म्हणतात तसे काहीच नाही

नाशिक : भाजप आणि शिवसेनेची राज्यात युती झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर राजी-नाराजीचे नाट्य कायम असून, गुरुवारी (दि. ३) नाशिक शहरात भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते अथवा एकही नगरसेवक हजर नव्हता. केवळ खासदार हेमंत गोडसे यांनी औपचारिक हजेरी लावल्याने जागावाटपातील सेनेची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्ये चार मतदारसंघ असून, त्यातील देवळाली मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र अन्य तीन मतदारसंघ भाजपकडे आहेत. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यात तिन्ही जागा भाजपने मिळवल्या होत्या. यंदा लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने विधानसभा जागावाटपात शहरातील दोन मतदारसंघ शिवसेनेला मिळावे अशी अपेक्षा होती. त्यापैकी किमान नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त असल्याने हा मतदारसंघ मिळावा अशी तेथील इच्छुक आणि नगरसेवकांची मागणी होती. मात्र तो न सुटल्याने सर्वच संघटित झाले असून, प्रसंगी बंडखोर उभा करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि.३) भाजपच्या मध्य नाशिकच्या उमेदवार आमदार देवयानी फरांदे आणि पश्चिम नाशिकच्या उमेदवार सीमा हिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित असले तरी सेनेचे नगरसेवक मात्र कोणीही नव्हते. यासंदर्भात संबंधित उमेदवारांनी निवडणूक लढवितांना जागावाटपात हा मतदारसंघ न सुटल्याने काहीशी नाराजी असली तरी आता मात्र कोणीतीही नाराजी नाही. नाराजांची समजूत पक्ष पातळीवर काढण्यात येईल तसेच सेनेचे नेतेदेखील त्यांना तसे आदेश देतीलच असेही या उमेदवारांनी सांगितले, तर खासदार हेमंत गोडसे अर्ज दाखल करताना उपस्थित होते असे सीमा हिरे यांनी सांगितले. भाजप समजूत काढणारशिवसेनेचे नगरसेवक नेते नाराज असले तरी त्यांची भाजपच्या वतीने समजूत काढली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी दिली. पक्षीय पातळीवर याबाबत प्रयत्न सुरू आहेच. आपले व्यक्तिगत शिवसेनेशी संबंध असल्याने नाराज नगरसेवक आपले ऐकतीलच, असेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना देखील कळवण्यात येईल आणि तेदेखील तसा आदेश शिवसैनिकांनी देतील, असेही सांगितले.

Web Title: Army corporators punished for filing BJP application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.