लष्कराने नागरी वस्तीत लावला रस्ता बंदचा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:20 PM2020-08-23T22:20:21+5:302020-08-24T00:14:37+5:30
देवळाली कॅम्प : येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंदचा करण्याचा लावण्यात आलेल्या सूचनाफलकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळाली कॅम्प : येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंदचा करण्याचा लावण्यात आलेल्या सूचनाफलकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिसराबरोबरच नानेगावला जाणारा रस्ताही बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रस्त्याबाबत नगरसेवक करंजकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीत विजयनगर परिसर नागरी वस्तीचा परिसर आहे. याच नागरी वस्तीलगत दुसऱ्या महायुद्धाच्या गरजेसाठी ब्रिटिशांनी विमानतळ तयार केले होते. विशेष म्हणजे यासाठी आवश्यक जागा शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. या जागेचा करारनामा संपल्यानंतरही लष्करी प्रशासनाने त्याच जागेवर गेल्या वर्षभरात तातडीने नवीन कार्यालये बांधकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटलष्करी प्रशासनाने अचानकपणे लावलेल्या सूचनाफलकामुळे स्थानिक रहिवाशांना रस्ताअभावी लाखो रुपये खर्च करून बांधलेली घरे तर सोडून द्यावे लागणार नाही ना, अशीच भीती वाटत आहे. सद्य:परिस्थितीत या परिसरात अनेकांनी पंधरा लाख रुपये गुंठ्याने जागा विकत घेऊन घरे बांंधली आहेत. अनेकजण तर आपल्या घराचे काय होणार, याच चिंतेत दोन दिवसांपासून दिसत आहे. नानेगावला जाण्यासाठी असणाºया एकमेव रस्ताही बंद झाला तर गावकºयांना दहा किलोमीटर रोजचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. भगूर नानेगाव रस्त्याबाबत लष्कर व ग्रामस्थांमध्ये अनेकदा पत्रव्यवहार होऊन वीस मीटर अंतराचा रस्ता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लष्कराकडून रस्ता बंदबाबत फलक लावण्यात आल्याने दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.