सेना पदाधिकाऱ्याचा भाजप आमदाराच्या कार्यालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:10 AM2019-07-14T00:10:59+5:302019-07-14T00:34:40+5:30
आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास आमदारांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. दरम्यान यावेळी आमदार हिरे व राणे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.
सिडको : आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास आमदारांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. दरम्यान यावेळी आमदार हिरे व राणे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.
एका विद्यार्थ्यास रहिवासी पुरावा म्हणून आमदारांच्या दाखल्याची गरज होती. आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयातील कर्मचाºयाने त्या विद्यार्थ्याला तीन वेळा परत पाठविल्याने संतप्त राणे यांनी आमदारांच्या कार्यालयात जाऊन कर्मचाºयांना जाब विचारला असता, आमदार हिरे यांच्या कार्यालयातून तसे पत्र देता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ राजकीय तणाव निर्माण होऊन गर्दी झाली होती.