सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:53 PM2018-07-26T23:53:50+5:302018-07-26T23:57:53+5:30

कळवण : सकल मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेच्या चार पदाधिकाºयांनी राजीनामे देऊन मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीकडे शिवसेनेचे लक्ष वेधले आहे.

Army resigns resign | सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Next
ठळक मुद्देकळवण : चौघांसह आहेर यांच्या भूमिकेचे स्वागत

कळवण : सकल मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेच्या चार पदाधिकाºयांनी राजीनामे देऊन मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीकडे शिवसेनेचे लक्ष वेधले आहे.
मंगळवारी मराठा आरक्षण संदर्भात कळवण बंदमध्ये पुढाकार घेणाºया शिवसेनेच्या या चार पदाधिकाºयांनी तसेच भाजपा सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहूल आहेर यांनी राजीनामा दिल्याने कळवण तालुक्यात त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. नाशिक जिल्हा शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, कळवण तालुका ग्राहक संरक्षण सेनेचे अध्यक्ष नाना देवरे, युवा सेना कळवण शहर उपाध्यक्ष सचिन पगार, युवा सेना उपतालुका अध्यक्ष राकेश शिवाजी आहेर यांनी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याकडे राजीनामा दिल्याने कळवण तालुक्यात शिवसेनेत खळबळ उडाली आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकाºयांचे राजीनामा नाट्य हे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीतून घडले असल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकाºयाने सांगितले.

Web Title: Army resigns resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.