‘आरोग्य रचना’ने दिला गावांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:12+5:302021-05-26T04:14:12+5:30
रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने रचना सेवाभाव अंतर्गत आरोग्य रचना हा उपक्रम कोराेनाकाळात राबविण्यात आला असून, अनेकांना आधार ...
रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने रचना सेवाभाव अंतर्गत आरोग्य रचना हा उपक्रम कोराेनाकाळात राबविण्यात आला असून, अनेकांना आधार दिला आहे. संस्थेशी संबंधित ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, माजी विद्यार्थी-पालक अशा ज्या कोणाला बाधित झाल्याने घराबाहेर पडता आले नाही त्यांना तत्काळ जीवनावश्यक साहित्य घरपोच देण्यात आले. तसेच हेल्पलाइन सुरू करून अनेकांना मानसिक आधार देण्यात आला. त्यापुढे संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात लक्ष घालून नुकतेच वाघेरा येथे वैद्यकीय किटचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील २०५ घरांमध्ये जाऊन कोराेना प्रतिबंधक हेल्थ किट तसेच आर्सेनिक अल्बम, साबण, मास्क असे साहित्य देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी डॉ. स्वानंद शुक्ल, सोनाली दाबक, आशिष गाडगीळ, अमृता भालेराव आदी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी डॉ. देवांग शुक्ल, कोमल ब्रह्मेचा, दिनेश तायडे, दीपक सहा आणि विठ्ठलराव पटर्वधन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चौधरी उपक्रमात सहभागी झाले होते. लोहशिंगवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, हिसवळच्या मदतीने ॲटिजन चाचणी करण्यात आली. साहेबराव हेंबाडे, भारत काकड, दिलीप हेंबाडे, देवीदास हेंबाडे, शिवाजी काकड, विलास सांगळे, डॉ. राहुल हेंबाडे, डॉ. कल्याणी हेबांडे यांनी उपक्रमात सहभाग घेतला. मैत्र लोहशिंगवे ग्रुपने यावेळी सहकार्य केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. जगताप यांनी मार्गदर्शन केले.
छायाचित्र आर फोटोवर २५आरोग्यरचना
===Photopath===
250521\25nsk_21_25052021_13.jpg
===Caption===
आरोग्य रचना