कौतीकपाडा येथे पंचवीस ट्रॅक्टर चारा आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:53 PM2018-02-12T14:53:08+5:302018-02-12T14:53:19+5:30
कौतीकपाडा - सटाणा तालुक्यातील मुळाने शिवारात शेतातील दुग्ध व्यवसायिकांच्या गुरांच्या चाºयाला लागलेल्या आगीत सुमारे २५ ट्रॅक्टर ट्रॉली आगीत भस्मसात झाल्या.
कौतीकपाडा - सटाणा तालुक्यातील मुळाने शिवारात शेतातील दुग्ध व्यवसायिकांच्या गुरांच्या चाºयाला लागलेल्या आगीत सुमारे २५ ट्रॅक्टर ट्रॉली आगीत भस्मसात झाल्या. आगीचा वेग इतका मोठा होता की चारा काही वेळेतच भस्म झाला. गावातील तरूणांनी आणि गावकºयांनी प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. सटाणा अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले, मात्र त्याचा फारसा उपयोग होवू शकला नाही. आगीचे कारण अद्याप कळाले नाही पण या आगीत मोठे नुकसान झाले आहे. राजेंद्र जगताप दुग्ध व्यवसाय करतात. त्यांनी मका किंवा बाजरी काढणीच्या वेळी चारा कसमादे पट्टा तसेच पिंपळनेर भागातून विकत घेऊन साठविला होता. उन्हाळ्यात आपल्या गुरांना चारा मिळावा यासाठी आधीच दीड ते दोन लाख खर्च करून हा चारा जमवावा लागतो. त्याबाबत ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनामा केला पण जगताप यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.