अर्पण हौसिंगमध्ये साकारत आहेत १०० वर्ष टिकाऊ घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:26+5:302020-12-04T04:37:26+5:30

२.७५ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात साकारत असलेल्या या गृह प्रकल्पामध्ये फक्त २५ लाखांत (सर्व खर्चासहित) दोन बीएचके ...

Arpan Housing is building 100 year old durable houses | अर्पण हौसिंगमध्ये साकारत आहेत १०० वर्ष टिकाऊ घरे

अर्पण हौसिंगमध्ये साकारत आहेत १०० वर्ष टिकाऊ घरे

Next

२.७५ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात साकारत असलेल्या या गृह प्रकल्पामध्ये फक्त २५ लाखांत (सर्व खर्चासहित) दोन बीएचके सदनिका मिळणार असल्याची माहिती संचालक अभय जैन यांनी दिली. प्रकल्पाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असून, येणाऱ्या फक्त तीन महिन्यातच सदनिकांचा ताबादेखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे बुकिंग केल्यानंतर ताबा मिळण्यासाठी दीर्घकाळ वाट बघण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबाबत सांगताना ते म्हणाले की, या प्रकल्पामध्ये विटांचे बांधकाम न करता पूर्ण भिंती या जगतविख्यात मिवान तंत्रज्ञानाद्वारे सिमेंट काँक्रीटने उभारल्या असून, या तंत्रज्ञानामुळे या सदनिकांचे आयुष्य हे कमीत कमी १०० वर्ष असते. या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे भिंतीस तडे जात नसल्याने इमारतीस फारसा मेंटेनन्स नसतो. या शिवाय या इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. या तंत्रज्ञानाने बांधण्यात येणारा नाशिक रोड भागातील हा पहिलाच प्रकल्प असून, आल्हाददायक हवामान लाभलेल्या देवळालीजवळील विहितगाव येथील अर्पण हाउसिंगमध्ये एकूण ३३६ सदनिका असून, बांधकामाच्या उत्तम दर्जा सोबतच २५ पेक्षा अधिक ॲमिनिटीज‌्देखील देण्यात आल्या असल्याचे चैन यांनी सांगितले. (वा.प्र.)

Web Title: Arpan Housing is building 100 year old durable houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.