आयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:56 AM2018-09-23T00:56:18+5:302018-09-23T00:56:43+5:30

गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Arrange arrangements for statue collection on ITI pool ghat | आयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

आयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

Next

सिडको : गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  सिडको व अबंड भागात गणरायाचे उत्सहात स्वागत करण्यात आले होते. रविवारी गणरायाला निरोप देण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी दान करण्यासाठी गणेश घाटावर व्यवस्था करण्यात येत असून, यंदाच्या वर्षीही जास्तीत जास्त नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी मूर्तिदान करण्यासाठी मनपाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.  सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी (२१) पहाणी केली. गणरायाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आल्यानंतर आता येत्या रविवारी (दि.२३) गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सिडको प्रभागात विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको व अंबड भागात पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, मूर्ती विसर्जनदेखील पर्यावरणपूरक व्हावे यासाठी मनपा सज्ज झाली आहे. आयटीआय पूल येथील गणेश विसर्जन घाटावर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. शुक्रवारी सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी मनपा विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, नाना जगताप, संजय गांगुर्डे यांच्यासमवेत पाहणी केली.
पोलीस यंत्रणा सज्ज
विसर्जन मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक दिवस अगोदरच अबंड पोलीस ठाण्याच्या वतीने मिरवणूक मार्गावर संचलन करण्यात आले. मिरवणुकीसाठी एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, आठ पेलीस उपनिरीक्षक, १५५ पोलीस कर्मचारी, २५ महिला पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्याचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिरवणूक मार्गावर महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दोन महिला अधिकाºयांसह सहा महिला पोलिसांच्या विषेश पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सिडको भागातून वेगवेगळ्या मार्गाने मिरवणूक निघणार असून, उत्तमनगर अंबड लिंक रोड तसेच पवनगर याठिकाणाहून मिरवणूक निघणार असून, त्रिमूर्ती चौकमार्गे आयटीआय पूल गणेश घाट येथे विसर्जन करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने संपूर्ण घाट परिसरात स्वच्छता करण्यात आला असून, घाटावरच गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था केली.
महापालिकेच्या वतीने आय.टी.आय. पूल गणेश विसर्जन घाट,वालदेवी नदी, संभाजी स्टेडियम, डे केअर सेंटर, इंदिरानगर जिजाऊ वाचनालय, पवननगर पाण्याची टाकी आदी ठिकाणी गणेशमूर्ती संकलनासाठी व्यवस्था केली आहे. नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याचे आवाहन सभापती हर्षा बडगुजर यांनी केले आहे.

Web Title: Arrange arrangements for statue collection on ITI pool ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.