२९ शासकीय निवारागृहात परप्रांतीयांची व्यवस्था (कोरोनापानासाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:08+5:302021-03-23T04:15:08+5:30
--इन्फो-- खास उत्तर भारतीय जेवणाची व्यवस्था निवारागृहात असलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवण मिळत असल्याने त्यांनी नाराजी दर्शविली होती. ...
--इन्फो--
खास उत्तर भारतीय जेवणाची व्यवस्था
निवारागृहात असलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवण मिळत असल्याने त्यांनी नाराजी दर्शविली होती. त्यामुळे अशा मजुरांना खास उत्तर भारतीय पद्धतीचे जेवण पुरविण्यात आले. छाेले, राजमा, दाल रोटी या पद्धतीचे जेवण त्यांना आवर्जून देण्यात आले.
--इन्फो--
२४ एप्रिलपासून रमजान महिना सुरू झालेला होता. या काळात निवारागृहात अंदाजे १८० मुस्लीम बांधव होते. त्यांनी प्रशासनाकडे रोजा धारण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी प्रशासनाने रोजा धारण करणे तसेच सोडण्यासाठी न्यू उम्मीद ट्रस्ट व दाऊदी बोहरा समाज यांच्या सहकार्याने दररोज रात्री ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या सहेरीसाठी (पहाटेच्या जेवणासाठी) आवश्यक असलेले अन्न पदार्थ त्यांना आश्यकतेनुसार पुरविण्यात आले. त्याचप्रमाणे सायंकाळी ४ ते ४.३० दरम्यान, इफ्तार (राेजाचा उपवास सोडण्यासाठी) त्यांना फळे व खजूरही पुरविण्यात येत होते.