वावीत बंदच्या आवाहनासाठी फेरी, गोंदे फाटा येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:03 PM2018-01-03T12:03:23+5:302018-01-03T12:03:45+5:30
सिन्नर/नांदुरवैद्य -: भीमा कोरेगाव येथील घटनेचे ठिकठिकाणी पडसाद उमटले असुन सिन्नर तालुक्यातील वावी येथे बंदचे आवाहन करण्यासाठी फेरी काढण्यात आली.
सिन्नर/नांदुरवैद्य -: भीमा कोरेगाव येथील घटनेचे ठिकठिकाणी पडसाद उमटले असुन सिन्नर तालुक्यातील वावी येथे बंदचे आवाहन करण्यासाठी फेरी काढण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे आज (दि.३) सकाळपासून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या घटनेच्या पाशर््वभूमीवर अनेक ठिकाणी घटनेस जबाबदार असणा-यांवर कारवाई करावी यासाठी निवेदने देण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी बसवर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान गोंदे फाटा परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये.यासाठी सकाळपासून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.त्याचप्रमाणे सकाळपासून गोंदे येथील औद्योगिक वसाहतीतील कामगारांची कामावर जाण्यासाठी धावपळ सुरु असतांना काही कामगारांना बससेवेच्या कडकडीत बंदचा फटका बसल्यामुळे आजचा दिवस घरी बसून काढावा लागल्याचे चित्र परिसरात दिसून आले. घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आल्याने रस्त्यावर शांतता दिसून येत होती.तसेच बससेवा व अन्य वाहने रस्त्यावरु न धावत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.यामुळे संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा अतिशय चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.