प्रत्येक लाभार्थ्यास धान्य घरपोच देण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:54+5:302021-05-20T04:14:54+5:30
सिन्नर: तालुक्यातील मुसळगाव येथे ग्रामपंचायतीने शासनाकडून दर महिन्याला रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मिळणारे धान्य वाटप करण्यासाठी कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ...
सिन्नर: तालुक्यातील मुसळगाव येथे ग्रामपंचायतीने शासनाकडून दर महिन्याला रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मिळणारे धान्य वाटप करण्यासाठी कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एक वेगळा उपक्रम राबवला. गावातील प्रत्येक लाभार्थ्यास हे धान्य घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे.
शिधापत्रिकेवरील धान्य घरपोच देण्यासाठी वाहन व्यवस्था व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायतीने सामाजिक जबाबदारी जोपासली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील कुठलाही व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून विविध योजना आखल्या असून प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळावे हा हेतू शासनाचा आहे. त्याच धर्तीवर मुसळगाव येथील ग्रामपंचायतीने घरपोच धान्य देण्याचा हा एक चांगला उपक्रम राबवला आहे.
मुसळगाव हे लोकसंख्येच्या तुलनेत या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे बहुधा हे गर्दीचे ठिकाण असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक कुटुंबाला घरपोच धान्य देण्याचे व पुरवण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे दुकानात गर्दी होणार नाही व लाभार्थ्यांना घरपोच सेवा मिळेल या उद्देशाने सरपंच रुपाली पिंपळे,उपसरपंच अनिल सिरसाट,पोलीस पाटील दीपक गाडेकर, ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर, मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या संकल्पनेतून प्रोत्साहन विकास सोसायटी रेशन दुकानदार,कर्मचारी राधाकिसन शिंदे,सप्नील भामरे,चेअरमन अशोक सिरसाट, पांडू बोडके व सर्व सदस्य यांच्या कृतीतून हा उपक्रम राबविला.
------------------
मुसळगाव ग्रामपंचायत मार्फत घरोघरी रेशन वाटप करताना राधाकिसन शिंदे, उपसरपंच अनिल सिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठोक व ग्रामस्थ. (१९ सिन्नर २)
===Photopath===
190521\19nsk_10_19052021_13.jpg
===Caption===
१९ सिन्नर २