प्रांताधिकाऱ्यांना अटक करून निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:24+5:302021-08-25T04:20:24+5:30
येवला : प्रांताधिकारी सोपान कासार यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांना अटक करून निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ...
येवला : प्रांताधिकारी सोपान कासार यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांना अटक करून निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.
प्रांताधिकारी कासार यांच्याविरुद्ध शहर पोलिसात महिला तलाठ्याचा विनयभंग व महिला तलाठ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रांताधिकारी सोपान कासार यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांना अटक करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले असून, आंदोलनात संजय पगारे, भाऊसाहेब अहिरे, बाळासाहेब कसबे, दयानंद जाधव, दीपक लाठे, वसंत घोडेराव, संगीता साबळे, शबाना शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(२४ येवला उपोषण)
240821\24nsk_49_24082021_13.jpg
प्रांताधिकार्यांना अटक करून निलंबीत करा मागणीसाठी येवला येथे धरणे आंदोलन