दीपस्तंभ चोरट्यांना अटक : अय्यपा मंदिर
By admin | Published: June 19, 2017 10:16 PM2017-06-19T22:16:38+5:302017-06-19T22:16:38+5:30
द्वारका परिसरातील अय्यपा मंदिरामधील मौल्यवान धातूचा दीपस्तंभ गेल्या रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
नाशिक : द्वारका परिसरातील अय्यपा मंदिरामधील मौल्यवान धातूचा दीपस्तंभ गेल्या रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळागावातून या गुन्ह्यातील म्होरक्याला अटक के ली आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा दीपस्तंभ हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका येथील अय्यप्पा मंदिरामध्ये रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास टेम्पोमधून येत तोंडाला रुमाल बांधून भिंतीवरून मंदिरात चोरट्यांनी उड्या घेतल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी धातूचा दीपस्तंभ पळवून नेला होता. याप्रकरणी मंदिराचे विश्वस्त ब्रह्मानंद केशवन पेरेरीकल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादित त्यांनी ३५ हजारांचा दीपस्तंभ चोरीला गेल्याने नोंदविले होते. पहाटे च्या सुमारास मंदिरात जेव्हा चोरी झाली तेव्हा येथील सुरक्षारक्षक शेरसिंग हा झोपलेला होता, त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीने अतिरंजित अशी चुकीची माहिती देऊन शेरसिंग याने तपासाची दिशा बदलविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बिड व पितळ या मिश्र धातूंचे सात थर असलेला दीपस्तंभ चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी वडाळागावातील आलिशान सोसायटीच्या मागील बाजूस राहणारा अमीर महेमुद काद्री (२१),अजहर उर्फ बंदर अजिज कुरेशी (२६,रा.बागवानपुरा) यांना अटक केली आहे.