लाच मागणाऱ्या मनपाच्या कर्मचाºयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:52 AM2018-12-19T00:52:28+5:302018-12-19T00:52:43+5:30
मंदिरासमोरील जागेच्या स्वच्छतेसाठी ६०० रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेणाºया नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१८) सापळा रचून रंगेहाथ पकडले़ धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे लाचखोर मिस्तरीचे नाव आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : मंदिरासमोरील जागेच्या स्वच्छतेसाठी ६०० रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेणाºया नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१८) सापळा रचून रंगेहाथ पकडले़ धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे लाचखोर मिस्तरीचे नाव आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील स्वामी लक्ष्मीनंद महाराज मंदिरासमोर दगड आणि मातीचे ढीग होते. त्यामुळे मंदिरासमोरील परिसराची स्वच्छता करावी, असा अर्ज तक्रारदाराने नाशिकरोड विभागीय कार्यालयात केला होता़
यावर संशयित धनंजय थोरभिसे याने तक्रारदारास स्वच्छता करून देण्याच्या मोबदल्यात सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तडजोडीअंती सहाशे रूपये मागितले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर याची शहानिशा करून सापळा रचला होता.
नाशिकरोड विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेड कार्यालयात सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाच घेताना थोरभिसे यास रंगेहाथ पकडण्यात आले़