खंडणी मागणाºया कार्यकर्त्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:38 AM2018-01-24T00:38:42+5:302018-01-24T00:39:05+5:30
नांदूर गावातील किराणा दुकानदाराने केलेल्या इमारतीच्या अतिरिक्त बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया नांदूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाºयास आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) रंगेहाथ पकडले़ या दोघा संशयितांकडून पोलिसांनी एक लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
पंचवटी : नांदूर गावातील किराणा दुकानदाराने केलेल्या इमारतीच्या अतिरिक्त बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया नांदूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाºयास आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) रंगेहाथ पकडले़ या दोघा संशयितांकडून पोलिसांनी एक लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदूर गावातील रहिवासी शिवाजी निमसे हे किराणा दुकानदार असून, त्यांनी इमारतीचे अतिरिक्त बांधकाम केले आहे़ याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता संशयित राजू मधुकर करंडे (३७) याने महापालिकेत अतिरिक्त बांधकामाबाबत तक्रार अर्ज केला होता़ यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार निमसे यांना फोन करून पैशांची मागणी करीत होता. यानंतर मध्यस्थी असलेला त्याचा सहकारी सचिन काशीनाथ धाकतोडे याच्या माध्यमातून पाच लाख रुपयांमध्ये हे प्रकरण मिटविण्याचे ठरले. किराणा दुकानदार निमसे यांना अतिरिक्त बांधकामाबाबत ब्लॅकमेल करून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया या दोघांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केलेली होती. त्यानुसार आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सापळा रचला़ नांदूर शिवारातील एका लॉन्सजवळ निमसे यांच्याकडून संशयित करंडे व धाकतोडे यांनी एक लाख २९ हजार रुपयांची खंडणी घेताच गुन्हे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर शिंदे, हवालदार लक्ष्मण बोराडे, दशरथ पागी, विनोद लखन, दिनकर भुसारे यांनी रंगेहाथ पकडले़
एकीकडे उपोषण... दुसरीकडे खंडणी
निमसे यांच्या अतिरिक्त बांधकामाची महापालिकेत तक्रार करणारा संशयित माहिती अधिकार कार्यकर्ता राजू करंडे हा २६ जानेवारीपासून आमरण उपोषणासाठी बसणार होता़ एकीकडे उपोषण तर दुसरीकडे खंडणीची मागणी करणाºया करंडेचा दुटप्पीपणा यामुळे समोर आला आहे़
माहिती अधिकारातून ब्लॅकमेलिंग?
किराणा व्यवसाय करणाºया निमसे यांच्या अतिरिक्त इमारत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी करंडे याने पाच लाख रुपयांची मागणी केली़ पोलिसांनी त्याच्याकडून काही कागदपत्रे जप्त केली असून, त्यात अनेकांची माहिती अधिकारात माहिती मागितली आहे़ त्यामुळे करंडे हा माहिती अधिकारातून माहिती मागवून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.