गोरक्षनगरमध्ये दहशत पसरविणाऱ्यास अटक

By Admin | Published: May 19, 2017 05:04 PM2017-05-19T17:04:53+5:302017-05-19T17:04:53+5:30

हातात तलवार घेऊन गोरक्षनगर परिसरात दहशत निर्माण करणारा संशयित आकाश दिलीप खैरणार (वय १९, रा.उमादर्शन सोसा.राजमाता मंगल कार्यालयाजवळ ) यास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़

The arrest of those who spread terror in Gorakhnagar | गोरक्षनगरमध्ये दहशत पसरविणाऱ्यास अटक

गोरक्षनगरमध्ये दहशत पसरविणाऱ्यास अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : हातात तलवार घेऊन गोरक्षनगर परिसरात दहशत निर्माण करणारा संशयित आकाश दिलीप खैरणार (वय १९, रा.उमादर्शन सोसा.राजमाता मंगल कार्यालयाजवळ ) यास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर परिसरात गुरुवारी(दि़१९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक तरुण हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित खैरनारला ताब्यात घेत त्याच्याकडील धारदार तलवार जप्त केली़ तसेच त्याच्याकडील दुचाकीही (एमएच १५ डीआर ५७९४) पोलिसांनी जप्त केली आहे़ या प्रकरणी त्याच्यावर म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: The arrest of those who spread terror in Gorakhnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.