पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:56 PM2020-10-03T22:56:10+5:302020-10-04T01:13:58+5:30
नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणा?्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणा?्या एका व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये पाठविल्याचे तपासात पुढे आले आहे.
नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणा?्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणा?्या एका व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये पाठविल्याचे तपासात पुढे आले आहे. कर्तव्यावर असलेल्या जवानांनी संशयित संजीव कुमार (वय २१, रा.मूळ आलापूर, जि.गोपालगंज, बिहार ) यास शनिवारी (दि.3) संध्याकाळी देवळाली कॅम्प पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड, देवळाली कॅम्प गांधीनगर हा भाग लष्कराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या भागात भारतीय तोफखाना केंद्र, आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल, स्कुल आॅफ आर्टिलरी देवळाली अशा प्रकारची महत्वाची लष्करी केंद्रे आहेत. त्यामुळे या भागात सवर्सामान्य व्यक्तींना प्रवेशबंदी असून या भागात कुठल्याहीप्रकारे विनापरवाना फोटो, व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसे सुचनाफलकसुध्दा या भागात लष्कराकडून लावण्यात आले आहेत. दरम्यान, लष्करी हद्दीत सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी राहणारा हा संशयित मजुर संजीव कुमार दीड ते दोन किलोमीटर लांब अंतर येऊन संध्याकाळी मोबाईलने सैनिकी रुग्णालयाच्या भागात फोटो काढताना जवानांना शुक्रवारी आढळून आला. त्यास तात्काळ ताब्यात घेत जवानांनी त्याचा मोबाईल जप्त केला आणि कसून चौकशी सुरु केली.
संबंधित फोटो पाकिस्तान येथील व्हाट्सअप ग्रुप वर पाठविले असल्याचे तपासानंतर निदशर्नास आले. त्यानंतर संबधीत लष्करी त्यांनी येथील जबाबदार वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या हा प्रकार निदशर्नास आणून दिला. सध्या देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्टेशन जवळील चिंतामणी बस स्टॉप कॅम्प रोड परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये हा संशयित संजीव वास्तव्यास आहे.
याप्रकरणी संजीव यास ताब्यात घेत शनिवारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी स्कुल आॅफ आर्टिलरी च्या मिडीयम बॅटरी येथील लष्करी अधिकारी ओमकार नाथ यादव(42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कार्यालयीन गोपनीयता अधिनियम1923च्या कलम 3 व 4प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.