वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी फरार आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 01:01 AM2022-02-21T01:01:35+5:302022-02-21T01:01:50+5:30
वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी गेल्या एक वर्षापासून फरार असलेला संशयित आराेपी सचिन उत्तम घाेरसळ याला येवला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. घोरसळ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
येवला : वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी गेल्या एक वर्षापासून फरार असलेला संशयित आराेपी सचिन उत्तम घाेरसळ याला येवला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. घोरसळ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घाेरसळ याने एक वर्षापूर्वी येवला शहरातील तहसील कार्यालय येथून प्रांताधिकारी कासार यांनी कारवाई केलेला वाळूचा डंपर चाेरून नेला हाेता. दरम्यान, घाेरसळ हा गुन्हा घडल्यापासून फरार हाेता. त्यास शहर पोलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक सूरज मेढे आणि सहकाऱ्यांनी निघाेज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे शिताफीने पकडून बेड्या ठाेकल्या.
घाेरसळ यास येवला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. घाेरसळ याचे विरोधात शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक तपास पाेलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करीत आहेत.