अमली औषधे बाळगल्याप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:26 AM2021-03-29T01:26:39+5:302021-03-29T01:27:33+5:30
मालेगाव शहरातील हकीमनगर भागात मानवी जीवितास अपायकारक गुंगी आणणारी औषधे लोकांना विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना बेकायदेशीर रित्या कब्जात बाळगल्याप्रकरणी नदीम अख्तर मोहंमद सलीम (४१,रा. हकीमनगर ग.नं.६) व वसीम अख्तर मोहंमद सलीम (रा. हकीम नगर ग.नं. ७) यांच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव : शहरातील हकीमनगर भागात मानवी जीवितास अपायकारक गुंगी आणणारी औषधे लोकांना विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना बेकायदेशीर रित्या कब्जात बाळगल्याप्रकरणी नदीम अख्तर मोहंमद सलीम (४१,रा. हकीमनगर ग.नं.६) व वसीम अख्तर मोहंमद सलीम (रा. हकीम नगर ग.नं. ७) यांच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिकचे औषध निरीक्षण अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक महेश विनायकराव देशपांडे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपी नदीम अख्तरला अटक केली असून वसीम अख्तर
फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून ७ हजार २०० रुपये किमतीच्या कोटेक्स कफ सायरपच्या ६० बॉटल्यांसह १४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड करीत आहेत.