प्रवाशांची लूट करणाऱ्या अंमळनेरच्या संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:46 PM2018-09-10T18:46:03+5:302018-09-10T18:48:08+5:30
नाशिक : रात्रीच्या वेळी प्रवाशांची लूट करुन फरार असलेल्या दोघा संशयितांपैकी एकास मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे़ आकाश शंकर शिंदे असे या सराईत संशयिताचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरचा रहिवासी आहे़ त्याच्याकडून चोरीचा मोबाईल व लॅपटॉपही जप्त करण्यात आला असून त्याच्यावर अंमळनेर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ १९ आॅगस्टला मध्यरात्री संजय ओहरा यांची संशयितांनी लूट केली होती़

संगमनेर येथील संजय ओहरा हे १९ आॅगस्टला मध्यरात्री गडकरी चौकात बसमधून उतरले़ या ठिकाणाहून शिंगाडा तलाव परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल, लॅपटॉप असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता़ या प्रकरणी ओहरा यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीष घोटेकर, हवालदार सुहास क्षीरसागर, पोलीस शिपाई युवराज गायकवाड यांनी या प्रकरणाचा लुटीलचा सखोल तपास करून अंमळनेर येथून संशयित आकाश शिंदे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप तसेच गुन्ह्यातील दुचाकी असा २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
दरम्यान, आकाशचा साथीदार फरार असून त्यांनी विहितगावमधून दुचाकी चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़