पाकीटमारी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:23 IST2019-10-20T00:23:11+5:302019-10-20T00:23:31+5:30
नाशिकरोड : रेल्वेत प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशाचे पाकीट चोरून नेणाºया संशयितास नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे

पाकीटमारी करणाऱ्यास अटक
ठळक मुद्देझोपलेल्या प्रवाशाचे पाकीट चोरल्याची कबुली
नाशिकरोड : रेल्वेत प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशाचे पाकीट चोरून नेणाºया संशयितास नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गीतांजली एक्स्प्रेसमध्ये समीर कार्तिक पात्रा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील ४,५०० रुपये रोख व कागदपत्रे असलेले पाकीट चोरून नेले होते. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिसांनी संशयित हुकूमदेव राजकुमार यादव यास पकडून त्याची चौकशी केली असता त्याने गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशाचे पाकीट चोरल्याची कबुली दिली.