२५ हजार क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:03 PM2017-08-01T23:03:41+5:302017-08-02T00:12:53+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ (गावठी) काद्यांची प्रचंड आवक होऊन बाजारभावात १०० ते १५० रुपयांची घसरण झाली आहे.

Arrival of 25 thousand quintal onions | २५ हजार क्विंटल कांद्याची आवक

२५ हजार क्विंटल कांद्याची आवक

Next

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ (गावठी) काद्यांची प्रचंड आवक होऊन बाजारभावात १०० ते १५० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याला सर्वोच्च १५५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. आवारात १५२५ वाहनांतून सुमारे २५ हजार क्ंिवटल आवक झाल्याचा अंदाज आहे. आवक वाढल्याने ंमंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत लिलाव सुरू होते. गत सप्ताहात सोमवारी ९०० रुपयांवरून कांद्याच्या दरात दररोज १०० ते १५० रुपयांची वाढ होत शुक्रवारपर्यंत बाजारभाव १६५० रुपयांपर्यंत पोहचले होते. परिणामी सोमवारी बाजारभाव १७०० ते १८०० रुपयांपर्यंत पोहचतील, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी एकच गर्दी केली.

Web Title: Arrival of 25 thousand quintal onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.