दोन दिवसात २९,००० क्विंटल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:53+5:302021-05-29T04:11:53+5:30
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात बुधवार व गुरुवार अशा दोन दिवसात २५ हजार क्विंटल ...
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार
आवारात बुधवार व गुरुवार अशा दोन दिवसात २५ हजार
क्विंटल कांद्याची आवक झाल्याने मोठी आर्थिक उलाढाल झाली.
बुधवारी ४९३ ट्रॅक्टरमधून १०,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन
कमाल २,०१५ रूपये,किमान ३०० रूपये तर सरासरी १,४००
ते १,५०० रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. गुरुवारी ८७९ ट्रॅक्टर्सद्वारे १८,५०० क्विंटल कांदा आवक होऊन कमाल भाव २००५ रूपये
किमान ३०० रुपये तर सरासरी १,६०० ते १,७०० रूपये प्रति क्विंटल
दराने व्यवहार झाले. कोरोनाचा जिल्हाभरासह विशेषतः ग्रामीण
भागात वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आल्याने बाजार समितीची खरेदी- विक्री प्रणालीही
निर्बंधात अडकल्याने बाजार ठप्प होते. मात्र २४ मे पासून कोरोनाचा
संसर्ग होऊ नये,यासाठीच्या उपाययोजना व चाचण्या यांची काटेकोर
अंमलबजावणी करत कांदा खरेदी - विक्री व्यवहार पूर्ववत करण्यात
आले . तोंडावर आलेला खरीप हंगाम, खते,बियाणे,अन्य शेतीविषयक
खर्चासाठी भांडवल उभारणीसाठी चाळीत साठवणूक करून उर्वरित
कांदा शेतकरी मोठ्या प्रमाणात उप आवारात विक्रीसाठी आणत असून आवकमध्ये सातत्याने वाढ होत आहे.