पिंपळगाव बसवंत परिसरातील गावागावात कृषिदूतांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 05:53 PM2019-06-20T17:53:34+5:302019-06-20T17:55:50+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील मुखेड व अंतरवेली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय तसेच लोणवडी येथे के. के. वाघ कृषिमहाविद्यालय नाशिक आदी ठिकाणच्या कृषी दुतांचे प्रशिक्षणासाठी आगमन झाले. तेथील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

Arrival of agriculturalists in village village of Pimpalgaon Baswant | पिंपळगाव बसवंत परिसरातील गावागावात कृषिदूतांचे आगमन

अंतरवेली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयांच्या कृषिदूतांचे स्वागत करतांना अंतरवेली गावच्या सरपंच सौ.निना गांगुर्डे,ग्रामसेवक एस. पी. पाटील आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील मुखेड व अंतरवेली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय तसेच लोणवडी येथे के. के. वाघ कृषिमहाविद्यालय नाशिक आदी ठिकाणच्या कृषी दुतांचे प्रशिक्षणासाठी आगमन झाले. तेथील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र माअंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती माती पाणी परीक्षण, किड व रोग यांचे एकित्रत व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आण िशेतकर्यांच्या शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषीदूतांकडून करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने शुभम शिंदे, ऋ षिकेष शिंदे, गणेश तावरे, शुभम पाटील, नितीन राजपूत, खंडेराव पतंगे हे विद्यार्थी मुखेड गावात राहून पुढील पंधरा आठवडे पदवी अभ्यासक्र मात घेतलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी मुखेड गावचे सरपंच जयश्री पवार, उपसरपंच मोहन पवार, ग्रामसेवक सुनील वाघ,पुंडलिक शेळके, दीपक जाधव, पप्पू पवार आदींनी कृषीदूतांचे स्वागत केले. कार्यक्र मास चेअरमन डॉ. एस. व्ही कोळसे, प्राचार्य डॉ. आय. बी चव्हाण, कार्यक्र म अधिकारी प्रा. एस. यु. सूर्यवंशी तसेच डॉ. के. के सूर्यवंशी, प्रा. एस. एस अहिरे, प्रा. के. जे पानसरे आदींनी मार्गदर्शन केले.
तसेच अंतरवेली येथे चतुर्थ वर्षातील आठ कृषिदूत अजय आव्हाड, विशाल गवळे, शुभम मुठाळ, कल्पेश जाधव, शुभम वाजे, अविनाश पाटील, कृष्णा आवारे, सुमित गवळी यांचा समावेश आहे.
याप्रसंगी सरपंच निना गांगुर्डे, उपसरपंच शिवाजी महाले, ग्रामसेवक एस. पी. पाटील आदी उपस्थित होते. त्यांना डॉ. एस. वी. कोळसे, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
लोणवाडी येथे के. के. वाघ कृषिमहाविद्यालय नाशिक येथील कृषीदूतांचे आगमन झाले या कृषिदूतांनी शेतकर्याना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र मांतर्गत २२ आठवडे घेण्यात येणाºया उपक्र माची माहिती दिली. के. के .वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे व कार्यक्र म समन्वयक प्रा. टी. बी. उगले, प्रा. पी. बी. पवार, प्रा. व्ही. सी कोरडे, प्रा. एन. बी. भोकनाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी दिनकर दौंड, प्रभाकर चोपडे, गोकुळ चोपडे, बाळासाहेब गरु ड, शामराव गवळी, विकास जाधव, रामकृष्ण सावळे, युवा शेतकरी गोकुळ दौंड हे उपस्थित होते. याप्रसंगी मयूर शिंदे, यज्ञेश पानगव्हाणे, तुषार शिंदे, सुर्यप्रताप कोरे, प्रफुल्ल शिरसाठ, आकाश लाळगे उपस्थित होते. सुत्रसंचलन मोरे व आभार कृषीदूत हर्षल आवारे यांनी मानले.

Web Title: Arrival of agriculturalists in village village of Pimpalgaon Baswant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी