अंदाजपत्रक समितीचे नाशकात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 AM2021-09-15T04:19:20+5:302021-09-15T04:19:20+5:30
बुधवारी (दि.१४) सकाळी समिती काही कार्यालयांना भेटी, तसेच प्रकल्पांची पाहणी करून दिवसभर जवळपास २५ विभागांचा आढावा घेतील. या समितीच्या ...
बुधवारी (दि.१४) सकाळी समिती काही कार्यालयांना भेटी, तसेच प्रकल्पांची पाहणी करून दिवसभर जवळपास २५ विभागांचा आढावा घेतील. या समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये माहिती संकलित करण्याची धावपळ सुरू होती.
चौकट===
नेल कटरपासून कंगव्यापर्यंत चोख व्यवस्था
अंदाजपत्रक समितीची बैठक शासकीय विश्रामगृहावरच प्रत्येक खात्यानिहाय होणार असल्याने, विश्रामगृहावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षांसह सदस्य हे नाशिकचे यजमान असल्याने त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही गैरसोय होणार नसल्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले असून, प्रत्येक सदस्यांच्या राखीव रूममध्ये नेल कटरपासून ते कंगव्यापर्यंत जवळपास ३० ते ३२ वस्तुंची यादीच त्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यात पायातील स्लीपर, टुथपेस्ट, ब्रश, शेविंग किट, फेशवॉश, डोक्याचे तेल, शॅम्पू, रूम फ्रेशनर, डिनर सेट, काचेचे ग्लास, कार परम्युम, क्रीम, पावडर, डीयो, बॉडी वॉश, फ्रुट बाउल आदी वस्तुंचा समावेश असल्याचे विश्रामगृहाच्या सूत्रांनी सांगितले.