जेष्ठा कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:39 PM2020-08-25T17:39:42+5:302020-08-25T17:41:42+5:30
मनमाड : ‘महालक्ष्मी कशाचा पावलावर....सोन्याच्या पावलावर’ च्या जयघोषात मोठ्या उत्साहात घरोघरी जेष्ठा-कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले. तीन दिवसांच्या पाहुण्या असलेल्या गौरींचे अनुराधा नक्षत्रावर अवाहन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्री पूजन व नैवद्य समर्पण करून मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते.

मंगळवारी (दि.२५) दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्र सुरू झाल्याने त्या नंतर घरोघरी गौरीचे अवाहन करण्यात आले. बुधवारी दुपारी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे आपल्या घरातील प्रथेप्रमाणे पूजन, नैवेद्य समर्पण, आरती आदी कार्यक्र म करण्यात येणार आहे.
घराघरात गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरु न सुंदर देखावे तयार केले जातात. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळेया असे प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. गुरु वारी (दि.२७) या गौरींचे विसर्जन करण्यात येणार आहे.