नाशिक बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:39 PM2018-12-15T12:39:56+5:302018-12-15T12:40:28+5:30
भाजीपाला : नाशिक बाजार समितीत मध्य प्रदेशातील लसणाची आवक वाढली
नाशिक बाजार समितीत मध्य प्रदेशातील लसणाची आवक वाढल्याने लसणाचे भाव उतरले असून, इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. जिल्ह्यात कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असून, टमाट्याचीही त्यात भर पडत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर भागात मोठ्या प्रमाणात येथे लसणाची आवक होते. मागील सप्ताहात लसणाची आवक वाढल्याने भाव कोसळले. किरकोळ बाजारात लसूण चक्क पाच रुपये किलोपर्यंत आला. शुक्रवारी नाशिक बाजार समितीत टमाट्याला ५०० रुपयांपासून २००० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. काकडीची आवक वाढली आहे. शुक्रवारी ९२६ क्विं टल काकडीची आवक झाली होती. भोपळ्याला ७२७ पासून ३३४० रुपये, तर सरासरी १६७० रुपये क्विं टलपर्यंत भाव मिळत आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, शुक्रवारी ६८४०० जुड्या कोथिंबिरीची आवक झाली होती.