नाशिक जिल्ह्यात मक्याची आवक वाढली; भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:36 AM2018-11-23T11:36:38+5:302018-11-23T11:37:12+5:30

बाजारगप्पा : नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे

The arrival of maize in Nashik district increased; Price stable | नाशिक जिल्ह्यात मक्याची आवक वाढली; भाव स्थिर

नाशिक जिल्ह्यात मक्याची आवक वाढली; भाव स्थिर

googlenewsNext

- संजय दुनबळे (नाशिक)

नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, भाव स्थिर आहेत. नांदगाव बाजार समितीच्या बोलठाण उपबाजारात बुधवारी मक्याचे भाव काहीसे वाढल्याचे दिसून आले. १५१२ रुपये प्रतिक्विंटल दराने येथे मका विकला गेला. सरासरी भाव १४२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक चांगली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

लासलगाव बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. गेल्या मंगळवारी येथे मक्याला ११९५ ते १४५२ आणि सरासरी १४२५ रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळाला. मक्याप्रमाणेच इतर भुसार मालाचीही या बाजार समितीत चांगली आवक असून, सर्वच मालाचे भाव चढे असल्याचे भुसार मालाचे व्यापारी नंदकुमार डागा यांनी सांगितले. कडधान्याच्या भावात क्विंटलमध्ये ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात रबीच्या आशा नसल्याने गहू-बाजरीच्या दरात वाढ झाली असल्याचे डागा म्हणाले. भविष्यात भुसार मालाचे भाव चढेच राहतील, असा अंदाजही त्यांनी वर्तविला.

लासलगावी गहू २१०० रुपयांपासून अगदी २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला जात आहे. बाजरीही गव्हाच्या बरोबरीने भाव घेत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. बाजरीला लासलगावी कमीत कमी २००० रुपये तर जास्तीत जास्त २३२५ रुपये क्ंिवटलचा भाव मिळत आहे. कमी पाऊस आणि रबीचा पेरा कमी याचा हा परिणाम असल्याचे दिसून येते.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही दररोज ४०० ट्रॅक्टर मक्याची आवक होत असून, येथे मक्याचे भाव स्थिर असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी दिली. मक्याची प्रत पाहून व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात असून, साधारणत: १३७५ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत भाव मिळत आहे. मालेगावी कडधान्याचे भाव स्थिर असल्याचे देसले म्हणाले. येथे हरभऱ्याला ३४०० ते ४४०० रुपये, तर मुगाला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्ंिवटल दर मिळत आहे. तुरीचे दर ३२८० ते ३४१५ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत आहेत. मालेगावी बाजरीची आवकही चांगली असल्याचे देसले यांनी सांगितले.

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक सुरू असून, येथे मका १४७५ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत विकला गेला. मात्र नांदगाव बाजार समितीच्या बोलठाण उपबाजार आवारात बुधवारी सकाळच्या सत्रात मक्याला १५१२ रुपये प्रतिक्ंिवटलचा दर मिळाला तर सरासरी दर १४२० रुपयांपर्यंत होता, असे  बाजार समितीतर्फे कळविण्यात आले आहे. मक्याची आर्द्रता पाहून व्यापारी खरेदी करीत असल्याने मका वाळवूून विक्रीसाठी नेल्यास त्याला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. सर्वच बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: The arrival of maize in Nashik district increased; Price stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.