फिरत्या वस्तुसंग्रहालयाचे मालेगावी आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 07:32 PM2022-06-27T19:32:48+5:302022-06-27T19:34:39+5:30

मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार आहे.

Arrival of Mobile Museum at Malegaon | फिरत्या वस्तुसंग्रहालयाचे मालेगावी आगमन

फिरत्या वस्तुसंग्रहालयाचे मालेगावी आगमन

googlenewsNext
ठळक मुद्दे विद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.

मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार आहे.

फिरत्या प्रदर्शनाचा पहिला कार्यक्रम सांजवहाळ येथील भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश पाटील होते. शिक्षक विनोद भामरे यांनी विद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. संग्रहालयाच्या प्रकल्प व्यवस्थापक कृतिका म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजीमहाराज वस्तू संग्रहालयाची तसेच फिरत्या प्रदर्शनाची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे दिली. फिरत्या प्रदर्शनाला जोडून " शिक्षणात संग्रहालयांची भूमिका " या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते संजय पाठक यांनी परिसंवादात सहभागी झालेल्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. परंपरा, इतिहास आणि संस्कृतीचे जतन करण्याचे काम संग्रहालये करत असतात असे प्रतिपादन पाठक यांनी याप्रसंगी केले. मोठ्या आकाराच्या दोन बसमधून दोन प्रदर्शने मांडण्यात आली आहेत.

संगीतविषयक प्रदर्शन
एका बसमधील प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास मांडण्यात आला आहे. तर दुसऱ्या बसमध्ये '' इन ट्यून '' हे संगीतविषयक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तबला, संतूर , सतार , गिटार, बासरी आदी वाद्यांच्या माध्यमातून ध्वनी पासून संगीतापर्यंत झालेला प्रवास मांडण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील शिक्षण मदतनीस रिमा जैस्वाल , आत्रेयी चक्रवर्ती , गौरव जाधव आदी उपस्थित होते .

 

Web Title: Arrival of Mobile Museum at Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.