उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:21 PM2021-06-09T22:21:40+5:302021-06-10T00:49:12+5:30
उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक निम्म्याने घटली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे.

बाजार समितीत सर्वोच्च २३८१ रुपये दराने विक्री झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोमवार ( दि.७) रोजी येथील स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीत व खारीपाडा येथील रामेश्वर कृषी बाजारात तिन हजार पाचशे वाहनांमधुन सुमारे सत्तर हजार क्विंटल आवक झाली होती.
परिणामी अचानक आवक वाढल्याने बाजारभावात दिडशे ते दोनशे रुपयांची कृत्रिम घसरण होत सर्वोच्च २१०० रुपये दराने कांदा विक्री झाला होता. तर सरासरी दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. झालेली घसरण बघता कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी काही अंशी कांदा विक्री थांबविली आहे.
येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत निम्म्याने आवक घटली आहे. आवक घटताच बाजारभावात पुन्हा दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे.
बाजार आवारात ७३३ ट्रॅक्टर व ३१५ पिकअप वाहनांमधुन सुमारे सतरा हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असुन बाजारभाव कमीत कमी १००१ रुपये,जास्तीत जास्त २३८१ रुपये तर सरासरी १८०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला.