येवला बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 05:32 PM2019-12-07T17:32:42+5:302019-12-07T17:32:56+5:30
कांद्यास देशांतर्गत चांगली मागणी वाढल्याने सप्ताहात कांदा आवक ५८४५ क्विंटल झाली
येवला : येथील बाजार समिती आवारात लाल कांद्याच्या आवकेस सुरु वात झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत चांगली मागणी वाढल्याने सप्ताहात कांदा आवक ५८४५ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २००० हजार ते कमाल १४ हजार रुपये आणि सरासरी ११ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर लाल कांद्याचे बाजारभाव किमान एक हजार ते कमाल १० हजार १०० रुपये आणि सरासरी ५५०० रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते.
सप्ताहात बाजार समितीत गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हाची एकुण आवक १८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १७५० रूपये ते कमाल २५०१ रुपये तर सरासरी १९९० रुपयापर्यंत होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक १७५ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १५५० रूपये ते कमाल २४५१ रुपये तर सरासरी १७७५ रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची एकूण आवक १६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २९४२ रुपये ते कमाल ४१०० रुपये तर सरासरी ३८५० रुपये पर्यंत होते. सप्ताहात सोयबीनची एकुण आवक १९१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० रुपये ते कमाल ३९५१ तर सरासरी ३७७५ रूपयापर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. मक्याची एकुण आवक ५ हजार २७७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १५०१ ते कमाल १९७२ रुपये तर सरासरी १८२५ रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे मक्याची एकुण आवक १२ हजार ५५ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १५०० ते कमाल २००० रुपये तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार पाटोदा येथे मक्याची एकुण आवक ६५०१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १६०० ते कमाल २०२२ तर सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.