सटाण्यात पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:19 PM2020-08-21T23:19:44+5:302020-08-22T01:14:33+5:30

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरु वारी (दि. २१) झालेल्या लिलाव प्रक्रियेत सुमारे पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती सभापती सुनीता देवरे यांनी दिली.

The arrival of twenty five thousand quintals of onions in Satna | सटाण्यात पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक

सटाण्यात पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक

Next

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरु वारी (दि. २१) झालेल्या लिलाव प्रक्रियेत सुमारे पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती सभापती सुनीता देवरे यांनी दिली.
१४७० वाहनांमध्ये कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याचा किमान ५५०, सर्वाधिक १७००, तर सरासरी १५५६ प्रति-क्विंटल भाव जाहीर झाला. त्याच-प्रमाणे मका ११५१, गहू १७४०, बाजरी १३७२, हरभरा ४२९२, भुईमूग शेंगा ५५००, ओली शेंग ३३००, तूर ४००१, मूग ६८२०, ज्वारी १३००, तिळी ४००० रुपये असे दर मिळाले. उपसभापती प्रकाश देवरे, सचिव भास्कर तांबे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नियमन मुक्तीच्या अध्यादेशाच्या विरोधात शुक्र वारी (दि. २१) बाजार समितीतर्फे एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. यामध्ये बाजार समिती अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

अभोण्यात कांद्याची विक्रमी आवक
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात गुरुवारी (दि. २०) ५९५ ट्रॅक्टर्सद्वारे १५ हजार क्विंटल अशी विक्रमी आवक झाली. कमाल १७०० रुपये, किमान ३०० रुपये तर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला बुधवारी (दि. १९) कमाल २११० रुपये भाव मिळाला होता. एकाच दिवसात ४०० रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक धास्तावला आहे.

Web Title: The arrival of twenty five thousand quintals of onions in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.