विघ्नहर्त्या गणरायाचे जलाभिषेकात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:54 AM2020-08-23T00:54:42+5:302020-08-23T00:55:06+5:30
ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे.
नाशिक : ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे.
गेल्याकाही दिवसांपासुन काहीशा निराशाजनक वातावरणात अचानक चैतन्य निर्माण झालेआणि घरोघर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अर्थातच, सुखकर्ता दुखहर्तासर्वांचीच संकटातून सुटका करेल या विश्वासातून! कोरोनाचे महासंकट आणि अन्य अनेक अडचणींवर मात करीत गणेशभक्तांनी याचैतन्याच्या उत्सवाचे स्वागत केले आणि अवघे शहर वेगळ्या उर्जेने भारलेगेले.
उत्सवावर नियमांच्या मर्यादा असल्या तरी उत्सावर नाही, याचीप्रचिती देणारे शहरातील वातावरण दिसून येत होते. दरवर्षी गणपती बाप्पाच्या स्वागताला आतुर असणा-या गणेशभक्तांनी यंदाहीमोठ्या उत्साहानेच शनिवारी (दि. २२) श्रींच्या स्वागतासाठी पायघड्याघातल्या. विविध रंगाच्या आणि काही कमलपुष्पावर तर काही सिंहासनारूढ गणेशमूर्तींनी यंदाही बाजारपेठ सजली होती. मुकूटापासून पगडी आणि फेटा परीधानकेलेले ऐटदार बाप्पा, कुठे राक्षसाचा वध करणारे तर कुठे कालीयामर्दनकरणारे महागणपती अशा साऱ्याच रूपांमधून लाडके रूप निवडण्यासाठी सकाळपासूनचगणेश मूर्तींच्या स्टॉलमध्ये गर्दी सुरू झाली होती.
व्दारका, नाशिकशहराचा मध्य भाग,नाशिकरोड, डोंगरे मैदान तसेच सिडकोतील मैदाने अशाठिकठिकाणी असलेल्या स्टॉलमधून गणरायाच्या मूर्ती घेण्यासाठी भरपावसातभक्त जमत होते. यंदा मूर्तीच्या उंचीवर मर्यादा असल्याने फार मोठ्यामूर्ती उपलब्ध नसल्या तरी मंडपाच्या आकाराच्या हिशेबाने सार्वजनिकमंडळांच्या मूर्ती प्रतिष्ठापीत झाल्या.
भरपावसातही गणेश मंडळांचा उत्साह प्रचंड जाणवत होता. नागरिक मूर्ती खरेदीसाठी पावसातच येत होते. डोंगरे मैदानावर तर प्रचंड चिखल झाला होता. मात्र, चिखल तुडवत गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिक येत होते. ढोलताशा वाजत नाही तोपर्यंत गणेशोत्सवाला रंग
चढत नाही. यंदा आगमन मिरवणुका नसल्यातरी भक्तीचा रंग अधिक होता. घंटा आणि थाळींच्या निनादात गणरायाचे स्वागत करण्यात आले. कोणत्याही मंडळाने मिरवणुका काढल्या नसल्यातरी ठिकठिकाणी पोलीस तैनात होते काही ठिकाणी त्यांनी गर्दी हटविण्याचेही काम केले.