येवल्यात अट्टल चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:20 AM2019-10-17T01:20:44+5:302019-10-17T01:21:01+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अनकुटे शिवारातून २ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

Arrived at the arrival of the Atal Chorte | येवल्यात अट्टल चोरटे जेरबंद

येवल्यात अट्टल चोरटे जेरबंद

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

येवला : अज्ञात चोरट्यांनी कुसमाडी येथील रहिवासी योगेश गावडे यांच्या घरात १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून पत्र्याच्या पेटीतील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा एकूण ४१ हजार रु पये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. सदरबाबत येवला तालुका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अनकुटे शिवारातून २ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. आरोपींची नावे नितीन तराईत चव्हाण, (२७, रा अनकुटे, ता. येवला), चंद्रकांत हंसराज ठाकरे, (३२, रा. गोपाळवाडी, ता. येवला), पंकज करामत काळे, (रा. राजुरा, जि. औरंगाबाद) (फरार)
आरोपी नितीन चव्हाण याने त्याचा साथीदार पंकज काळे याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून, चोरी केलेला मुद्देमाल चंद्रकांत ठाकरे यास विकलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेतलेले आरोपींच्या कब्जातून गुन्ह्यात चोरीस गेलेला एमआय कंपनीचा मोबाइल हस्तगत केला आहे.
यातील आरोपी नितीन चव्हाण हा येवला तालुक्यातील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, हवालदार शांताराम घुगे,नाईक रावसाहेब कांबळे, कॉन्स्टेबल भाऊसाहेब टिळे, प्रवीण काकड, विशाल आव्हाड, इम्रान पटेल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.




ऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
(फोटो १६ येवला क्राईम)

Web Title: Arrived at the arrival of the Atal Chorte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.